Chinchwad Crime News : उघड्या दरवाजावाटे घरातून दोन मोबाईल फोन आणि दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज : रात्रीच्या वेळी अर्धवट उघड्या असलेल्या दरवाजातून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातून दोन मोबाईल फोन आणि घराच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 12) सकाळी पावणे पाच वाजता वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे उघडकीस आली.

अविनाश विश्वनाथ चिंतलवाड (वय 22, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी (दि. 11) रात्री साडेअकरा ते शनिवारी (दि. 12) पहाटे पावणे पाच या कालावधीत घडली. रात्रीच्या वेळी फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा अर्धवट उघडा होता. त्या उघड्या दरवाजातून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला.

घरातून 24 हजारांचे दोन मोबाईल फोन आणि दुचाकीची चावी चोरली. त्यानंतर चावीच्या साहाय्याने फिर्यादी यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली त्यांची मोपेड दुचाकी (एम एच 14 / एफ बी 6636) असा एकूण 49 हजारांचा ऐवज चोरून नेला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.