Chinchwad Crime News : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज – कामावर निघालेल्या दुचाकीस्वाराचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला. शाहूनगर येथील केएसबी चौक पुलावर गुरूवारी (दि.14) दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात घडला.

गजानन नारायण काळे, असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ राजू नारायण काळे (वय 41, रा. नुल, ता. गडहिंग्लज, कोल्हापूर ) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गजानन काळे हे (एमएच 09 / एपी 1802) दुचाकीवरून कामावर जात होते. केएसबी येथील पुलावर पाठीमागून आलेल्या (एम एच 14 / एएस 9121) डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी होऊन काळे यांचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांचाळ अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like