Chinchwad crime News : सोसायट्यांच्या पार्किंगमधून होतेय वाहन चोरी; चाकण, दिघी, चिखली, वाकडमधून चार दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहन चोरीचे सत्र सुरूच आहे. यामध्ये गृहनिर्माण सॊसायट्यांच्या पार्किंगमधून चोरटे वाहने चोरुन नेत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. चाकण, दिघी, चिखली आणि वाकड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 29) प्रत्येकी एक वाहनचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद केली आहे.

चाकण पोलीस ठाण्यात आकाश सोपान शिवळे (वय 23, रा. शिवळीवाडा, म्हाळुंगे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 16 हजारांची दुचाकी 28 सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा ते पावणे अकरा या कालावधीत चाकण तळेगाव रोडवर म्हाळुंगे येथून चोरून नेली.

ओमप्रकाश बाबूलाल बोहरा (वय 35, रा. आदर्शनगर, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी बोहरा यांची 20 हजारांची दुचाकी (एम एच 14 / एच वाय 5769) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली.

अमर मुरलीधर कुलकर्णी (वय 48, रा. साने चौक चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कुलकर्णी यांची 30 हजारांची दुचाकी (इमे च 14 / डी एस 8462) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या सोसायटीच्या पर्किंग मधून चोरून नेली.

रेणुका रमेश चव्हाण (वय 28, रा. वाकडरोड, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी चव्हाण यांची 30 हजारांची दुचाकी (एम एच 14 / सी बी 8972) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पार्किंगमधून चोरून नेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.