Chinchwad crime News : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार, खून प्रकरणातील पीडित  कुटुंबाला न्याय कधी मिळणार ?

एमपीसी न्यूज – पिंपरी येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करून आरोपी पळून गेला. या घटनेला दोन वर्ष उलटून गेली आहेत. मात्र आरोपी अजूनही मोकाटच आहे. या पीडित  कुटुंबाला न्याय कधी मिळणार, असा सवाल अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.

याबाबत अखिल भारतीय जनवादी महिला संघटना आणि डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने संघटनेच्या अध्यक्षा अपर्णा दराडे, शैलजा कडुलकर, शेहनाज शेख, रंजिता लाटकर, सचिन देसाई, अमिन शेख, स्वप्निल जेवळे, किसन शेवते, अविनाश लाटकर, गणेश दराडे, क्रांतिकुमार कडुलकर यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे.

_MPC_DIR_MPU_II

निवेदनात म्हटले आहे की, पिंपरीमधील सात वर्षाच्या मुलीवर एका नराधमाने बलात्कार केला. त्यानंतर तिचा खून करून तिचा मृतदेह पिंपरी येथील एच ए कंपनीच्या मैदानात फेकून दिला. या घटनेनंतर आरोपी पळून गेला.

याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर मोलमजुरी करणाऱ्या तिच्या आई-वडिलांचा देखील मृत्यू झाला. त्यांची दोन मुले एका नातेवाईकाकडे राहत आहेत. या घटनेला दोन वर्ष उलटली आहेत. मात्र पोलिसांना अजूनही आरोपी सापडला नाही.

पीडित  कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी कोणती कायदेशीर कारवाई केली, याची माहिती जनतेला द्यावी. या प्रकरणाचा फेर तपास करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा. अनाथ झालेल्या दोन्ही मुलांचे शासनाने पुनर्वसन करावे, अशी मागणी देखील निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.