Chinchwad Crime News : मास्क न वापरणाऱ्या 309 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – मास्क न वापरणा-यांवर कारवाईची मोहीम सध्या शहरात सुरु आहे. विनामास्क फिरताना आढळल्यास थेट दंडाची पावती केली जात आहे. मंगळवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 309 जणांवर विनामास्कची कारवाई केली.

शहरात कोरोना वाढत असल्याने खबरदारी घेण्यासाठी मास्क वापरण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. मात्र अनेकजण या नियमांना पायदळी तुडवून विनामास्क फिरताना आढळतात. अशा नागरिकांवर पोलीस कारवाई करीत आहेत.

मंगळवारी पोलिसांनी केलेली कारवाई पुढीलप्रमाणे –

एमआयडीसी भोसरी (00), भोसरी (31), पिंपरी (08), चिंचवड (00), निगडी (29), आळंदी (35), चाकण (31), दिघी (17), म्हाळुंगे चौकी (20), सांगवी (34), वाकड (17), हिंजवडी (15), देहूरोड (02), तळेगाव दाभाडे (00), तळेगाव एमआयडीसी (49), चिखली (06), रावेत चौकी (15), शिरगाव चौकी (00)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.