Chinchwad crime News : विवाहितेचा छळ करून गर्भपात केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – वेगवेगळ्या कारणांवरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच गर्भपाताची औषधे देऊन तिचा गर्भपात केला. याबाबत सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सनी नाना वाघचौरे (वय 31), सासू आशा नाना वाघचौरे (वय 56), सासरे नाना वाघचौरे (वय 60), नणंद नीता गायकवाड (वय 36, सर्व रा. नेहरूनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित महिलेने गुरुवारी (दि. 22) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 23 मार्च 2011 पासून 22 ऑक्टोबर 2020 या कालावधीत घडला. आरोपींनी विवाहीतेकडे आई-वडिलांकडून गृहोपयोगी वस्तू आणण्याची मागणी केली. त्यानुसार विवाहितेच्या आई-वडिलांनी वस्तू दिल्या. त्यानंतर पती सनी याने बाहेरील स्त्रियांशी संबंध ठेऊन विवाहितेला मारहाण करत शिवीगाळ केली.

तसेच विवाहितेला गर्भपाताची औषधे देऊन तिचा गर्भपात घडवून आणला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III