Chinchwad Crime News : व्यावसायिक आनंद उनावणे अपहरण, खून प्रकरण; कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यानेच रचला अपहरण, खंडणी आणि खुनाचा कट

सात आरोपींना बेड्या

0

एमपीसी न्यूज – पिंपरीतील व्यवसायिक आनंद उनावणे यांचे अपहरण करून खून करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करत पिंपरी पोलीस, खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चार मुख्य आरोपींसह सात आरोपींना अटक केली आहे. हा प्रकार मयत उनावणे यांनी त्यांच्या कंपनीतून काढलेल्या एका माजी कर्मचाऱ्याने केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दृश्यम स्टाईलने एक वर्षापासून कट रचून चार जणांच्या मदतीने त्याने हा गुन्हा केला आहे.

उमेश सुधीर मोरे (वय 28, रा. काळेवाडी), दीपक धर्मवीर चंडालिया (वय 34, रा. रावेत), सागर दत्तात्रय पतंगे (वय 28, रा. कटफळ, ता. बारामती), बाबू उर्फ तुळशीराम नथुराम पोकळे, अशी मुख्य आरोपींची नावे आहेत.

आरोपींनी खंडणीपोटी घेतलेले सोन्याचे दागिने कोणत्याही पावतीशिवाय खरेदी करणारे राकेश राजकुमार हेमणानी (वय 27, रा. पिंपरी), कपिल ग्यानचंद हासवाणी (वय 30, रा. पिंपळे सौदागर), प्रवीण नवनाथ सोनवणे (वय 22, रा. मदनवाडी, ता. इंदापूर) या तिघांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रभू पुजारी हा अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पिंपरीतील फ्रेंड्स फंड इंडिया चीटफंड कंपनीचे कार्यकारी संचालक आनंद साहेबराव उनावणे (वय 42, रा. नर्मदा बिल्डिंग, नवीन म्हाडा वसाहत, मोरवाडी, पिंपरी) असे अपहरण आणि खून झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. याबाबत विष्णू साहेबराव उनावणे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रभू पुजारी उनावणे यांच्या चिटफंड कंपनीत मुख्य रिकव्हरी एजंट म्हणून काम करत होता. त्याच्या वर्तणुकीवरून उनावणे यांनी त्याला एक वर्षापूर्वी कामावरून काढले होते. त्याचा पुजारी याच्या मनात होता. त्यावरून त्याने उनावणे यांना मारण्याचा तसेच त्यांच्याकडून मिळेल तेवढे पैसे उकळण्याचा कट रचला. त्याने अन्य चार आरोपींना विश्वासात घेतले. एक वर्षापासून हा कट रचला जात होता.

3 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री उनावणे यांच्या राहत्या घरापासून पाच जणांनी मिळून कार (एम एच 14 / जे ए 7115) यामधून उनावणे यांचे अपहरण केले. त्यांना खंडणी मागून लाखो रुपयांची खंडणी घेतली. उनावणे यांना पैसे गोळा करायला लावून आरोपी उमेश मोरे, दीपक चंडालिया यांनी मोपेड दुचाकीवरून येऊन खंडणीची रक्कम नेली.

आरोपींनी उनावणे यांना हिंजवडी, ताम्हिणी घाट मार्गे महाड येथे नेले. प्रवासादरम्यान आरोपींनी कारमध्ये उनावणे यांचा दोरीने गळा आवळून खून केला. उनावणे यांचा मृतदेह दगडाने ठेचून भोराव गाव, महाड येथील सावित्री नदीच्या पुलावरून फेकून दिला. उनावणे यांचा मृतदेह 6 फेब्रुवारी रोजी नदी पत्रात आढळला.

त्यानंतर या गुन्ह्याच्या तपासाकरिता पिंपरी चिंचवड पोलिसांनी सहा पथके तयार केली आहेत. तसेच गुन्हे शाखा युनिट दोनचेही पथक समांतर तपास करत होते. पोलिसांनी आरोपी दीपक चंडालिया याला हरियाणा येथून अटक केली. आरोपी उमेश, बाबू आणि सागर यांनाही पोलिसांनी सापळा लावून अटक केली.

आरोपींनी खंडणीत घेतलेले सोन्याचे दागिने खरेदी केल्याने पोलिसांनी राकेश राजकुमार हेमणानी, कपिल ग्यानचंद हासवाणी, प्रवीण नवनाथ सोनवणे यांनाही अटक केली. नियमित येणेजाणे नसताना तसेच ओळख नसताना त्यांनी दागिने खरेदी केले. यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

आरोपी दीपक कडून एक लाख 70 हजार रोख रक्कम, सागर पतंगे कडून 14 लाख 85 हजार 290 रुपयांचा मुद्देमाल, तुळशीराम पोकळे याच्याकडून एक लाख 10 हजारांचा मुद्देमाल, आरोपी उमेश मोरेकडून तीन लाख 388 रुपयांचा मुद्देमाल, आरोपी प्रवीण सोनवणे कडून 9 लाख रुपये, राकेश हेमणानी कडून 2 लाख 50 हजार रुपये, आरोपी कपिल हासवानी कडून 8 लाख रुपये असा एकूण 39 लाख 5 हजार 678 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हीच कार ऑक्टोबर महिन्यातील अपहरण प्रकरणात वापरली

उमेश, दीपक, सागर आणि बाबू या आरोपींनी ऑक्टोबर महिन्यात एक अपहरण आणि खंडणीचा गुन्हा केला होता. त्यात ते आरोपी बाहेर आल्याने मुख्य आरोपी प्रभू पुजारी याने हेरले आणि त्यांना गुन्ह्यात समाविष्ट करून घेतले. दरम्यान एम एच 14 / जे ए 7115 ही बेलेनो कार ऑक्टोबर महिन्यातील गुन्ह्यात आणि उनावणे प्रकरणात वापरली होती.

2000 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी

गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी पिंपरी, मोरवाडी, फिनोलेक्स चौक, पिंपरी गाव, काळेवाडी, रहाटणी, कोकणे चौक, पिंपळे सौदागर, जगताप डेअरी या परिसरातील 2000 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यातून एक लिंक तयार करून पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला.

दृश्यम चित्रपटातील कथेप्रमाणे रचला कट

फोन दुसऱ्या ठिकाणी ठेवायचाआपण एका ठिकाणी राहायचं. स्वतःच्या मोबाईलवरून संपर्क न करणे. अपहृत व्यक्तीच्या मोबाईल वरून संपर्क करणे. फोनवर प्रत्यक्ष न बोलता मेसेजद्वारे संपर्क करणे, अशा क्लुप्त्या वापरून आरोपींनी हा गुन्हा केला. उनावणे यांचा मोबाईल फोन काम झाल्यानंतर कर्नाटककडे जाणाऱ्या एका ट्रकमध्ये फेकून दिला. त्यातून आरोपींनी पोलिसांची दिशाभूल केली. त्यामुळे पोलीस या तपासासाठी चक्क सोलापूर पर्यंत गेले. हा प्रकार त्यांनी दृश्यम चित्रपट पाहून केल्याचे समोर आले आहे.

चोरीचा माल खरेदी करणारे सुद्धा चोरच

खंडणी, चोरी केलेला माल जाणीवपूर्वक खरेदी करणारे देखील चोरच असतात. त्यातूनच या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उप-आयुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त प्रेरणा कटटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद वाघमारे, सहाय्यक निरीक्षक गणेश लोंढे, सुधीर चव्हाण, प्रमोद भांडवलकर, राजु काकडे, शेखर कुलकर्णी, शांताराम हांडे, अमोल चौगुले, दत्तात्रय निकम, महेश शिंदे, अनिल गायकवाड, विवेकानंद सपकाळे, भिसे, रमिजा गोलंदाज, पोलीस नाईक शहाजी धायगुडे, सुहास डंगारे, ओंकार बंड, उमेश वानखेडे तसेच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, उपनिरीक्षक शाकिर जिनेडी, महेंद्र पाटील, कर्मचारी सुनिल कानगुडे, संदीप पाटील, शैलेश मगर, अशोक गारगोटे तसेच गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक निलपत्रेवार, कर्मचारी वेताळ, राऊत, राऊत, जमीर तांबोळी यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment