Chinchwad crime News : तडीपार गुन्हेगारांवर पोलिसांचा ‘स्मार्ट वॉच’; द्यावी लागणार रोज ऑनलाइन हजेरी

एमपीसी न्यूज – तडीपार केलेले असतानाही अनेक गुंड शहरात येऊन गुन्हे करतात. या वाढत्या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी तडीपार केलेल्या गुन्हेगारांवर ‘स्मार्ट वॉच’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे तडीपार गुंडाला दररोज लोकेशनसह फोटो पोलिसांना पाठवावा लागणार असल्याची माहिती पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

तडीपार गुंडाला शहरातून तडीपार केल्यावर तो कोणत्या जिल्ह्यात राहणार आहे. त्या जिल्ह्यात पोलीस त्याला सोडवून येतात. तडीपारीनंतर तो ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार आहे. त्या ठिकाणच्या पोलीस ठाण्यात त्याची नोंद केली जाते.

_MPC_DIR_MPU_II

मात्र, अनेक तडीपार गुंड शहरात येऊन गुन्हे करतात. या तडीपार गुंडांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी त्याला आता दररोज ऑनलाइन हजेरी ठेवली आहे. त्याने दररोज ज्या ठिकाणी तो आहे तेथून लोकेशनसह फोटो पाठविणे बंधनकारक केले आहे. ज्या दिवशी तो लोकेशनसह फोटो पाठविणार नाही त्या दिवशी तेथील पोलीस त्याचा शोध घेतील. तो मिळून आला नाही तर त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

…तर संपूर्ण टोळी तडीपार करणार

दारू भट्टी लावणे, ती लावण्यासाठी साहित्य व साधने पुरविणे, तोडफोड करणे, जुगार-मटका अड्डा चालविणे, अशा प्रकारचे गुन्हे संघटितरित्या केले जातात. या टोळ्यांची परिसरात दहशत असल्याने तक्रार देण्यासाठी नागरिक पुढे येत नाहीत. अशा गुन्ह्यातील आरोपींवर दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे असल्यास संबंधित टोळीवर तडीपारीची एकत्रितरित्या कारवाई केली जाणार आहे. त्याबाबतचे आदेश कृष्ण प्रकाश यांनी सर्व पोलिसांना दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.