Chinchwad Crime News : छेडछाडीचा जाब विचारल्याने चौघांकडून दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज – नातेवाइक तरुणीच्या छेडछाडीचा जाब विचारल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून दोघा जणांना लोखंडी रॉड, सिमेंट गट्टू आणि लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 19) दुपारी अजंठानगर, चिंचवड येथे घडली.

सागर रोहिदास कोपनर (वय 28, रा. हरगुडे वस्ती, चिखली) आणि विकास मेटकरे अशी मारहाणीत जखमी झालेल्या दोघांची नावे असून याबाबत कोपनर यांनी सोमवारी (दि. 19) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

सागेश पाटोळे (वय 26), सौरभ फुळवळे (वय 20), संजय फुळवळे (वय 23, तिघेही रा. अजंठानगर, चिंचवड) आणि गजानन (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी सागेश, सौरभ आणि संजय या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोपनर यांच्या नातेवाइक तरुणीला आरोपी पाटोळे हा छेडत होता. याबाबत फिर्यादी कोपनर यांनी जाब विचारला असता ‘मला विचारणारा तू कोण’, असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी पाटोळे याने आपल्या साथीदारांना बोलावून कोपनर आणि मेटकरे या दोघांना लाथा-बुक्‍क्‍या हत्याराने मारहाण करीत दहशत निर्माण केली.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.