Chinchwad Crime News : वाल्हेकरवाडी येथे अज्ञात तरुणाचा गळा चिरून खून

एमपीसी न्यूज – वाल्हेकरवाडी येथे अज्ञातांनी एका अज्ञात तरुणाचा गळा चिरून निर्घृणपणे खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 11) रात्री घडली आहे.

खून झालेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही. मयत तरुणाचे वय अंदाजे 20 ते 22 वर्ष आहे. निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, काळ्या रंगाचा फुल बाह्याचा शर्ट, पिवळ्या रंगाचे धातूचे घड्याळ, गळ्यात पांढ-या रंगाचा रुमाल, रंग सावळा असे मयत तरुणाचे वर्णन आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी रोडवर रानमळा हॉटेलच्या मागील बाजूला असलेल्या ज्वारीच्या शेतात गुरुवारी सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. अज्ञात आरोपींनी तरुणाचा गळा चिरून खून केला आहे.

मयत तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. मयत तरुणाच्या बाबतीत काही माहिती असल्यास चिंचवड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.