Chinchwad Crime : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 345 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – शहरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. कोरोनाचा वाढता धोका शहरातील जनजीवन पुन्हा ठप्प करण्यासाठी कारण बनण्याची शक्यता आहे. पोलिसांनी देखील प्रशासनाच्या नियमांचे पालन न करणा-यांवर कारवाईची संख्या वाढवली आहे. शनिवारी (दि. 21) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तब्बल 345 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 192 नवीन रुग्णांची शनिवारी नोंद झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 90 हजार 481 वर पोहोचली आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. कोरोनाची पुन्हा लाट आल्यास शहरातील जनजीवन पुन्हा एकदा ठप्प होण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी काटेकोरपणे खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

दरम्यान, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न करणा-यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. शनिवारी शहरातील 345 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

एमआयडीसी भोसरी (22), भोसरी (4), पिंपरी (78), चिंचवड (0), निगडी (39), आळंदी (0), चाकण (0), दिघी (11), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (31), वाकड (70), हिंजवडी (70), देहूरोड (4), तळेगाव दाभाडे (4), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (12), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.