Chinchwad Crime : पोलिसांकडून शनिवारी 214 जणांवर खटले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शनिवारी (दि. 10) 214 जणांवर खटले दाखल केले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या नियमांचे पालन न करणा-यांवर पोलिसांकडून भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी न थुंकण्याचे तसेच मास्क वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

शनिवारी वाकड पोलिसांनी सर्वाधिक कारवाई केली आहे. वाकड पोलिसांनी तब्बल 77 जणांवर एका दिवसात कारवाई केली आहे. तर चाकण, देहूरोड आणि शिरगाव पोलिसांनी एकावरही कारवाई केलेली नाही.

शनिवारी पोलिसांनी केलेली कारवाई –
एमआयडीसी भोसरी (1), भोसरी (3), पिंपरी (19), चिंचवड (11), निगडी (4), आळंदी (21), चाकण (0), दिघी (23), म्हाळुंगे चौकी (1), सांगवी (9), वाकड (77), हिंजवडी (10), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (3), तळेगाव एमआयडीसी (4), चिखली (11), रावेत चौकी (17), शिरगाव चौकी (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.