Chinchwad Crime : पोलिसांकडून रविवारी 303 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणा-या 303 जणांवर रविवारी (दि. 29) कारवाई केली.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना पुन्हा एकदा वाढू लागला आहे. मागील काही दिवसात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. रविवारी (दि. 29) पिंपरी-चिंचवड शहरात 192 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 92 हजार 159 एवढी झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रशासनाचे आदेश न पाळणा-या नागरिकांवर रविवारी केलेली कारवाई –
एमआयडीसी भोसरी (58), भोसरी (16), पिंपरी (35), चिंचवड (0), निगडी (54), आळंदी (1), चाकण (0), दिघी (35), म्हाळुंगे चौकी (24), सांगवी (47), वाकड (27), हिंजवडी (0), देहूरोड (2), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (4), चिखली (0), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (0)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.