Chinchwad Crime : कुख्यात रावण टोळीच्या सदस्याला अटक; एक पिस्टल, दोन काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज – कुख्यात रावण टोळीच्या एका सदस्याला खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

कुणाल चंद्रसेन गायकवाड (वय 22, रा. बिल्डींग नंबर 10, अजिंठानगर, थरमॅक्स चौक चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस नाईक निशांत काळे व आशिष बोटके यांना माहिती मिळाली की, वाल्हेकरवाडी रोड, रावेत येथे हॉटेल पंजाबी स्ट्रीट समोर एक इसम त्याच्या मित्राला भेटण्यासाठी येणार आहे. त्याच्याकडे बेकायदेशीर पिस्टल आहे. त्यानुसार परिसरात सापळा लावून पोलिसांनी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास कुणाल गायकवाड याला ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी 30 हजार 400 रुपयांचा हा शस्त्रसाठा जप्त करत त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

आरोपी कुणाल गायकवाड हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी/दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उप निरीक्षक अनिकेत हिवरकर, तसेच पोलीस कर्मचारी महेश खांडे, अशोक दुधवणे, उमेश पुलगम, निशांत काळे, आशिष बोटके, विक्रांत गायकवाड व सुधीर डोळस यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.