Chinchwad Crime : दापोडीतून रिक्षा, दिघीतून दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – बॉम्बे कॉलनी दापोडी येथून ऑटो रिक्षा तर वडमुखवाडी येथून दुचाकी चोरीला गेली आहे. याबाबत गुरुवारी (दि. 5) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

मोहंमद इमरान मेहंदी हसन शेख (वय 38, रा. बॉम्बे कॉलनी, दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात ऑटो रिक्षा चोरीची फिर्याद दिली आहे. शेख यांची 60 हजार रुपये किमतीची ऑटो रिक्षा (एम एच 12 / क्यू आर 5059) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराजवळून चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

भीमाशंकर माणिक जमादार (वय 39, रा. आदिनाथ नगर, भोसरी) यांनी दुचाकी चोरीची दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जमादार यांची 15 हजारांची मोपेड दुचाकी (एम एच 12 / एल जी 5714) अज्ञात चोरट्यांनी आळंदी रोड, वडमुखवाडी येथून चोरून नेली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.