Chinchwad Crime : पिंपरी चिंचवड शहर परिसरातून सात वाहने चोरीला

एमपीसी न्यूज – भोसरी, चाकण, एमआयडीसी भोसरी, वाकड, चिखली, देहूरोड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी सात वाहने चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत गुरुवारी (दि. 19) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भोसरी परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. योगेश विलास पवार (वय 35, रा. विकासनगर, किवळे) यांनी त्यांची 50 हजारांची एच एफ डिलक्स दुचाकी (एम एच 14 / एच वाय 7596) बुधवारी (दि. 18) रात्री दहा वाजता कलासागर डॉमिनोज, कासारवाडी येथून चोरीला गेल्याची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकी चोरटा जोतिराम अंकुश सातपुते (वय 20, रा. शांतीनगर भोसरी) याला अटक केली आहे.

दुस-या प्रकरणात राम आनंदा धुंदळे (वय 29, रा. आळंदी रोड, भोसरी) यांनी त्यांची 12 हजारांची मोपेड दुचाकी (एम एच 05 / बी पी 8843) घरासमोरून चोरून नेली. हा प्रकार बुधवारी (दि. 18) सकाळी उघडकीस आला. याबाबत अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

चाकण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात दिलीप पांडुरंग टेंभूर्णे (वय 31, रा. मोई, मूळ रा. माजलगाव, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची 25 हजारांची हिरो स्प्लेंडर दुचाकी (एम एच 14 / जी व्ही 6977) 16 नोव्हेंबर रोजी चाकण वाईन दुकानासमोर चोरून नेली.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात संदेश सूर्यकांत तापकीर (वय 24, रा. वाङमुखवाडी, च-होली) यांनी फिर्याद दिली. त्यांची 10 हजारांची दुचाकी (एम एच 14 / सी टी 7034) 17 सप्टेंबर रोजी मोशी येथून चोरीला गेली होती. याप्रकरणात पोलिसांनी प्रदीप सूर्यकांतनं तरकसे (वय 21, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) याला अटक केली आहे. त्याने तापकीर यांची दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे.

वाकड पोलीस ठाण्यात अमोल बाजीराव घायवट (वय 32, रा. गणेशनगर, थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्यांनी अमोल यांची 35 हजारांची पल्सर दुचाकी (एम एच 14 / जी बी 8121) वाकड पोलीस लाईन जवळ असलेल्या एटीएम समोरून चोरून नेली आहे.

चिखली पोलीस ठाण्यात एकनाथ धोंडीराम पंडित (वय 56, रा. अण्णाभाऊ साठेनगर, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. पंडित यांची 35 हजारांची रिक्षा (एम एच 14 / ए एस 1898) अज्ञात चोरट्यांनी सोनावणे वस्ती रोड, तळवडे येथून चोरून नेली आहे.

देहूरोड पोलीस ठाण्यात कामील यामिन अन्सारी (वय 27, रा. देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी अन्सारी यांचे देहूरोड येथे ऑटो पॉईंट नावाचे गॅरेज आहे. त्यांच्या गॅरेजमध्ये पल्सर दुचाकी (एम एच 14 / ए यु 7333) दुरुस्तीसाठी आली होती. अज्ञात चोरट्यांनी 15 हजारांची दुचाकी गॅरेजसमोरून चोरून नेली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 19) सकाळी उघडकीस आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.