Chinchwad Crime : भोसरी, चाकण, देहूरोड परिसरातून सहा दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – भोसरी एमआयडीसी, भोसरी, चाकण आणि देहूरोड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी सहा दुचाकी चोरून नेल्या. याबाबत बुधवारी (दि. 4) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कृष्णा अनिलराव वैद्य (वय 28, रा. भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वैद्य यांची दीड लाख रुपये किमतीची बुलेट (एम एच 14 / जे सी 1883) अज्ञात चोरट्यांनी स्पाईन सिटी चौकातून चोरून नेली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

अविनाश अमर सूर्यवंशी (वय 26, रा. खालुम्ब्रे, ता. खेड) यांची 25 हजारांची पल्सर दुचाकी (एम एच 14 / ई जे 1612) चोरट्यांनी म्हाळुंगे गावातील बजाज कंपनीसमोरून चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

पारसनाथ त्रिवेणीप्रसाद शुक्ला (वय 45, रा. सानेचौकी, चिखली) यांची 25 हजारांची दुचाकी (एम एच 14 / जी एफ 9937) गुळवे वस्ती, भोसरी येथून चोरून नेली. सतीश नामदेव साळुंके (वय 26, रा. दापोडी) यांची 30 हजारांची दुचाकी (एम एच 14 / जे डी 7292) दापोडी येथून चोरून नेली. तसेच तुषार चंद्रकांत आंबेडकर (वय 29, रा. काळेवाडी) यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 14 / ई जे 5329) नाशिक फाटा उड्डाणपुलाखालून चोरून नेली. वरील तिन्ही गुन्ह्यांचा तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

सिंधू अंबादास सोनवणे (वय 56, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / जे सी 7635) चोरट्यांनी चोरून नेली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.