Chinchwad Crime : शहरातून सहा वाहने चोरीला; तीन कारच्या काचा फोडून ऐवज पळवला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून चोरट्यांनी चार दुचाकी, दोन तीन चाकी रिक्षा अशी सहा वाहने चोरून नेली आहेत. तर तीन कारच्या काचा फोडून कारमधून रोख रकमेसह महत्त्वाचा ऐवज पळवला आहे. याबाबत मंगळवारी (दि. 6) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

पिंपरी आणि सांगवी परिसरातून चोरट्यांनी तीनचाकी रिक्षा चोरून नेल्या आहेत. पिंपरी पोलीस ठाण्यात विठ्ठल मातु पवार (वय 38, रा. विद्यानगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. पवार यांची 50 हजारांची तीनचाकी रिक्षा (एम. एच. 12 / आर पी 7493) 3 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ ते साडेदहा वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली.

सांगवी पोलीस ठाण्यात राजेंद्र पुनाप्पा रोकडे (वय 48, रा. पवनानगर, जुनी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. रोकडे यांची एक लाख 20 हजार किमतीची तीनचाकी रिक्षा (एम एच 12 / क्यू. ई. 8554) 4 ऑक्टोबर रोजी पहाटे एक ते सकाळी सात वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली आहे.

भोसरी येथील गुरुविहार कॉलनीमध्ये सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली 15 हजारांची दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार 3 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आला. याबबत संदीप अशोक बनसुडे (वय 32, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शंकर दासराव पांचाळ (वय 42, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीबाबत फिर्याद दिली आहे. पांचाळ यांची 20 हजारांची दुचाकी (एम. एच. 14 / एच. वाय. 2671) बोराटे वस्ती, मोशी येथील सार्वजनिक रोडवरून चोरून नेली आहे. हा प्रकार 4 ऑक्टोबर रोजी पहाटे साडेबारा ते पावणेदोन या कालावधीत घडला आहे.

अनिल लक्ष्मण पारखी (वय 42, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पारखी यांची 10 हजारांची दुचाकी (एम एच 14 / सी. बी. 3314) त्यांच्या घराच्या अंगणातून चोरट्यांनी चोरून नेली आहे. हा प्रकार 5 ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता उघडकीस आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

कुशिंदर संजय कांबळे (वय 23, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, कांबळे यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 14 / एफ. व्ही. 9080) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली. हा प्रकार 1 ऑगस्ट रोजी उघडकीस आला असून याबाबत 6 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन कारच्या काचा फोडून ऐवज पळवला

हिंजवडी, वाकड आणि पिंपरी परिसरात तीन कारच्या काचा फोडून चोरट्यांनी कारमधून रोख रक्कम आणि किमती ऐवज पळवून नेला. हिंजवडी पोलीस ठाण्यात मिलिंद बैद्यावास राळेगावकर (वय 48, रा. म्हाळुंगे) यांनी फिर्याद दिली आहे.

मंगळवारी (दि. 6) दुपारी अडीच ते पावणेतीन वाजताच्या सुमारास बेंगलोर-मुंबई महामार्गावर बीटवाईज कंपनीजवळ अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या होंडा सिटी कारच्या (एम एच 12 / जी. के. 3603) काचा फोडून कारमधून बॅग आणि त्यातील 50 हजारांची रोख रक्कम, डेबिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स चोरून नेले.

रवींद्रकुमार मनोहर मोहरे (वय 52, रा. चिंचवड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोहरे यांनी त्यांची कार (एम एच 01 / सी पी 3602) सोमवारी (दि. 5) दुपारी ताथवडे येथील एक्सेल ऑटो येथे पार्क केली होती. दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास अज्ञातांनी त्यांच्या कारच्या काचा फोडून एक लॅपटॉप, लॅपटॉप बॅग, वायफाय, महत्वाची कागदपत्रे असा एकूण 30 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

पिंपरी परिसरात पुणे-मुंबई महामार्गावर सेन्ट्रल मॉलच्या समोर अज्ञातांनी एका बीएमडब्ल्यू कारच्या काचा फोडून कारमधून महत्त्वाचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.