Chinchwad Crime : सामाजिक सुरक्षा पथकाची दोन हॉटेल चालकांवर कारवाई

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या काळात लोकांची गर्दी करून दारू विक्री केल्याप्रकरणी एका हॉटेल चालकावर आणि विनापरवाना दारू विक्री केल्याप्रकरणी एका हॉटेल चालकावर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली.

दोन्ही हॉटेल चालकांवर भारतीय दंड विधान कलम 188, 269, 34, महाराष्ट्र प्रोहिबिशन कायदा कलम 65 (ई), साथीचा रोग कायदा कलम 3, राष्ट्रीय आपत्ती अधिनियम 2005 चे कलम 50 (ब) महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना 2020 चे कलम 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऋषभ प्रदीप हादगे (वय 29, रा. निगडी), आकाश पोपट आडसूळ (वय 29, रा. वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या हॉटेल चालकांची नावे आहेत. याबाबत सामाजिक सुरक्षा पथकाचे भगवंता मुठे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऋषभ याचे वाल्हेकरवाडी रोडवर गुरुद्वारा चौकात राजमुद्रा व्हेज नॉनव्हेज हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये लोकांना एकत्र जमवून ऋषभ याने देशी-विदेशी तसेच बियर दारूची विक्री केली. यामुळे कोरोना साथीचा संसर्ग पसरविण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले. याबाबत पोलिसांनी कारवाई केली आहे.

तर आरोपी आकाश याचे गुरुद्वारा चौकात राजमुद्रा व्हेज नॉनव्हेज हॉटेल आहे. आकाश याने त्याच्या हॉटेलमध्ये कोणताही शासकीय परवाना न घेता बेकायदेशीरपणे दारूची विक्री केली. सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई करत हॉटेल मधून 13 हजार 10 रुपयांच्या दारूच्या बाटल्या आणि 28 हजार 30 रुपयांची रोख रक्कम जप्त केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.