chinchwad Crime : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

_MPC_DIR_MPU_IV

एमपीसी न्यूज – सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 24) दुपारी साडेबारा वाजता तुकाराम नगर, शिवाजी चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली. याबाबत सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

मिलिंद पांडुरंग वाघमारे (वय 33, रा. तुकाराम नगर, शिवाजी चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. त्याच्यासह सासू माया पांडुरंग वाघमारे, सासरे पांडुरंग वाघमारे, नणंद मनीषा विकास कांबळे, नंदावा विकास कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दादा हनुमंत काटे (वय 24, रा. चिखली. मूळ रा. पिलीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी मंगळवारी (दि. 24) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी काटे यांच्या 32 वर्षीय बहिणीने आत्महत्या केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती मिलिंद हा सतत दारू पिऊन मयत विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करून त्रास देत होता. सासू माया, सासरे पांडुरंग यांनी विवाहितेला सतत किरकोळ कारणावरून मानसिक त्रास दिला. विवाहितेची नणंद आणि नंदावा यांनी अन्य आरोपींना विवाहितेबद्दल वाईट गोष्टी सांगून तिला त्रास दिला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.