Chinchwad Crime : मोशी, वाकड, हिंजवडी मधून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – मोशी मधून बुलेट, वाकड मधून दुचाकी तर हिंजवडी परिसरातून मोपेड दुचाकी चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अज्ञात चोरट्यांच्या विरोधात सोमवारी (दि. 23) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ऋषिकेश हनुमंत लोखंडे (वय 24, रा. जाधववाडी, चिखली. मूळ रा. कन्हेरसर, ता. खेड) यांनी बुलेट चोरी बाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोखंडे यांची 90 हजारांची बुलेट (एम एच 14 / जी क्यू 2558) मोशी मधील स्पाईन सिटी मॉल समोरून चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 21) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

महारुद्र शंकर सरकाळे (वय 39, रा. सुदर्शन कॉलनी, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सरकाळे यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 14 / डी क्यू 0503) अज्ञात चोरट्यांनी रविवारी (दि. 22) रात्री आठ ते साडेआठ वाजताच्या सुमारास डांगे चौक, वाकड येथून चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

लक्ष्मण रामदास बांदल (वय 24, रा. पारखेवस्ती, माण, ता. हवेली) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बांदल यांची 25 हजारांची मोपेड दुचाकी (एम एच 14 / के यु 7780) अज्ञात चोरट्यांनी रविवारी (दि. 22) दुपारी दोन ते रात्री नऊ या कालावधीत हिंजवडी फेज तीन मधील टीसीएस कंपनीच्या गेट जवळील पार्किंगमधून चोरून नेली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.