Chinchwad Crime : शहरातून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून तीन दुचाकी चोरीला गेल्याबाबत रविवारी (दि. 18) चाकण, चिंचवड आणि निगडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मंगेश बाजीराव येळवंडे (वय 31, रा. खालुम्ब्रे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांची 12 हजारांची दुचाकी (एम एच 14 / ए आर 8167) त्यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.

जयंत सुधाकर पवार (वय 38, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांची 30 हजार्नाची दुचाकी (एम एच 02 / सी एम 1996) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पार्किंगमधून चोरून नेली आहे.

सुर्यकांत दत्तात्रय सिंदकर (वय 48, रा. चिंचवड स्टेशन) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांची 20 हजारांची दुचाकी (एम एच 14 / डी झेड 4470) अज्ञात चोरट्यांनी घरासमोरून चोरून नेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.