Chinchwad Crime : विरोधी गटातील तरुणासोबत बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून अल्पवयीन भावाने केली वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज – बहिणीने विरोधी गटातील तरुणासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला. या कारणावरून अल्पवयीन भावाने काही साथीदारांसोबत मिळून वाहनांची तोडफोड केली. हा प्रकार मंगळवारी (दि. 27) रात्री वेताळनगर, चिंचवड येथे घडला.

पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.  स्वानंद चंद्रकांत कांबळे (वय 20, रा. वेताळनगर, चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

तोडफोड करणा-या मुलाच्या बहिणीने विरोधी गटातील एका तरुणासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला. प्रेमविवाह केल्यानंतर मंगळवारी दोघेजण घरी आले होते. दोघेही एकाच परिसरात राहतात. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन दोन्ही कुटुंबियांना समजावून सांगितले होते.

_MPC_DIR_MPU_II

त्यातूनही तणावाची परिस्थिती लक्षात घेत परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. मंगळवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास अल्पवयीन मुलाने त्याच्या साथीदारांसोबत मिळून परिसरातील वाहनांची तोडफोड केली. एकूण 12 वाहनांची तोडफोड करण्यात आली असून 10 तीनचाकी तर दोन दुचाकी वाहनांचा समावेश आहे.

वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलीस अन्य आरोपींचा शोध घेत आहेत. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.