Chinchwad : शहरातील 78 नागरिकांवर टाळेबंदीचे उल्लंघन केल्याबाबत गुन्हे

लॉकडाऊन शिथील झाले असले तरी जमावबंदीसह काही निर्बंध कायम आहेत. मात्र शहरातील काही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करून आदेशाचे उल्लंघन करतात.

एमपीसी न्यूज – लॉकडाऊन शिथील झाले असले तरी जमावबंदीसह काही निर्बंध कायम आहेत. मात्र शहरातील काही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करून आदेशाचे उल्लंघन करतात. अशा 78 नागरिकांवर पोलिसांनी शनिवारी (दि. 22) भारतीय दंड विधान कलम 188 अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यातच मृतांचा आकडाही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच लॉकडाऊन शिथील करण्यात आला असला तरी जमावबंदीसह काही निर्बंध कायम आहेत. त्याचे पालन करावे, असे आवाहन प्रशासन व पोलिसांकडून केले जात आहे.

मात्र तरीही काही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार शनिवारी केलेली कारवाई –

एमआयडीसी भोसरी (21), भोसरी (4), पिंपरी (3), चिंचवड (0), निगडी (6), आळंदी (1), चाकण (0), दिघी (5), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (0), वाकड (3), हिंजवडी (22), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (8), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (0), रावेत चौकी (1), शिरगाव चौकी (4)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.