Chinchwad : सराईत गुन्हेगार कपाळया स्थानबद्ध; पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांचे आदेश

एमपीसी न्यूज – सराईत गुन्हेगार कपाळ्या याच्यावर घातक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे दहा गुन्हे दाखल आहेत. याबाबत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आदेश दिले.

आकाश उर्फ कपाळया राजू काळे (वय 27, रा. पत्राशेड झोपडपट्टी, लिंकरोड, चिंचवड) असे कारवाई केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड आणि पिंपरी परिसरात लोखंडी रॉड, कोयता यांसारखी हत्यारे बाळगून जबरी चोरी, दुखापत, दंगा, खुनाचा प्रयत्न, हल्ल्याची पूर्वतयारी, घरात अनधिकृतरित्या शिरून दुखापत करणे, तडीपार आदेशाचा भंग करणे, सरकारी नोकरावर हल्ला करणे, खंडणी मागणे, अवैधरीत्या शस्त्र बाळगणे यांसारखे 2011 पासून त्याच्यावर दहा गुन्हे दाखल आहेत. त्याचा गुन्हेगारीचा आलेख वाढता आहे. त्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिले. बुधवारी (दि. 13) त्याला येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

ही करवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, रामचंद्र जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, श्रीराम पौळ, भीमराव शिंगाडे, पोलीस कर्मचारी सचिन चव्हाण यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.