Chinchwad : मॉरिशस  येथील रूपाजी गणू यांना संस्कृती संवर्धन पुरस्कार

एमपीसी न्यूज – मॉरिशस देशात मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी (Chinchwad) योगदान देणारे रूपाजी गणू यांना कलारंजन प्रतिष्ठानच्या वतीने संस्कृती संवर्धन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्याशी मॉरिशस मधील मराठी संस्कृती याविषयी मुक्त संवाद होणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले यांनी कळविले आहे.

Pune : गणेशविसर्जन मिरवणूकीसाठी शहरातील 17 रस्ते वाहतूकीसाठी बंद, जड वाहनांना शहरात प्रवेश बंद

चिंचवड समरसता गुरुकुलममध्ये रविवारी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, कासारवाडी येथील दत्तमंदिर ट्रस्टचे विश्वस्त विजय जगताप, शिवानंद स्वामी महाराज आदी उपस्थित राहणार आहेत.

मॉरिशस देशात मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी रूपाजी गणू हे योगदान देत आहेत. मराठी भाषेचा प्रसार, प्रचार मॉरिशसमध्ये करतात. मराठी संस्कृती तिथेही जपतात. त्यामुळे त्यांना संस्कृती संवर्धन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

त्यांच्याशी मराठी संस्कृती याविषयी मुक्त संवाद होणार आहे. या कार्यक्रमाला नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित (Chinchwad) राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.