Chinchwad : मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर चिंचवडगाव परिसरात संचारबंदी

एमपीसी न्यूज – श्रीमान महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा यावर्षी शुक्रवार (दि. 1 जानेवारी) ते सोमवार (दि. 4 जानेवारी) या कालावधीत संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी मंदिरात येत असतात. सध्या कोरोनाची साथ सुरु असल्याने संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी चिंचवडगाव परिसरात जमावबंदीचे आदेश दिले आहेत.

दरवर्षी श्रीमान महासाधु मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्यासाठी पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड शहरातून दररोज सुमारे 30 ते 35 हजार भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. श्रीमान मोरया गोसावी यांनी मार्गशीर्ष व षष्ठी शके 1483या दिवशी जिवंत समाधी घेतली. श्री मोरया गोसावी हे महागाणपत्य होते.

चिंचवड, मोरगाव, सिध्दटेक व थेऊर ही चार गणपती क्षेत्रे श्री मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने झालेली क्षेत्रे आहेत. संजीवन समाधी सोहळयाच्या दिवशी दिल्या जाणाऱ्या महाप्रसादास भाविकांमध्ये फार मोठे महत्व आहे.

सध्या कोरोना साथ सुरु असल्याने श्रीमान महासाधु मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा 20 लोकांच्या उपस्थितीत सिमीत व प्रतिकात्मक स्वरुपात करण्यास प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

त्यामुळे श्रीमान महासाधु मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा महोत्सवा दरम्यान दि. 1 जानेवारी मध्यरात्री बारा  ते 4 जानेवारी 2021 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत मोरया गोसावी मंदिर परिसर चिंचवड, चाफेकर चौक, छत्रपती चौक, शिवाजी महाराज चौक, गांधी पेठ, पडवळ आळी, पावर हाऊस चौक गावडे भाईर आळी, सुखकर्ता अपार्टमेन्ट, जिजाऊ पर्यटन केंद्र, फकिरामाई पानसरें उर्दु शाळा चौक, गणेश पेठ, मंगलमुर्ती वाडा परिसर, काळभैरवनाथ मंदिर परिसर, धनेश्वर मंदिर परिसर, चिंतामणी गणेश मंदिर / मोरया यात्री निवास, मोरया प्रसाद हॉल समोरील रोड या भागात संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेले जमावबंदी आदेश अंमलात राहतील. या कालावधीत वरील परिसरात परवानगी शिवाय जमाव करता येणार नाही.

श्रीमान महासाधु मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा महोत्सवा दरम्यान विनापरवानगी कोणतेही कार्यक्रम घेता येणार नाहीत. मोरया गोसावी मंदिर चिंचवड परिसरात विनापरवानगी जाता येणार नाही.

हा आदेश खालील बाबींमध्ये लागू राहणार नाही –

# अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरविणारी खाजगी/सरकारी रुग्णालये, दवाखाने, आरोग्य सेवा देणारे डॉक्टर व वैद्यकीय सेवेशी संबंधित कर्मचारी व त्यांची वाहने, रुग्णवाहिका तसेच SARI, ILI Contact Tracing या व अधिकारी/कर्मचारी, संदर्भात सर्वेक्षण करणारे.

# कायदेशीर कर्तव्य बजावत असणा-या शासकीय अधिकारी व कर्मचारी (उदा. महसुल, पोलीस, पाणीपुरवठा, अग्निशामक, विद्युत पुरवठा) विभागातील कार्यरत अधिकारी/ कर्मचारी.

# जीवनावश्यक सेवेतील आस्थापना (उदा. दूध, फळे, भाजीपाला, किराणा, पिण्याचे पाणी घरोघरी जारद्वारे पुरवठा करणारी यंत्रणा तसेच घरगुती स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे सिलेंडर पुरवणारी यंत्रणा)

# प्रशासनाने कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर राहण्यासाठी पास दिलेल्या व्यक्ती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.