Chinchwad : स्त्री जातीचे मृत अर्भक सापडल्याने खळबळ

एमपीसी न्यूज – चिंचवड येथे स्त्री जातीचे मृत अर्भक सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. रविवारी (दि. 10) दुपारी दोनच्या सुमारास धनेश्वर पुलाजवळ अर्भक आढळून आले.

सहायक पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी दोनच्या सुमारास एका स्थानिक नागरिकाने धनेश्वर पुलाजवळ दुर्गंधी सुटल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार वाकड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता एका सिमेंटच्या पोत्यामध्ये स्त्री जातीचे मृत अर्भक असल्याचे दिसून आले. पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी अर्भक यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रुग्णालयात हलवले आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.