BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : पहिल्या टप्प्यातच मेट्रो निगडी ते कात्रजपर्यंत करण्याची मागणी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना चिंचवड प्रवासी संघाचे निवेदन

129
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पहिल्या टप्प्यातच मेट्रो निगडी ते कात्रजपर्यंत व्हावी या मागणीचे निवेदन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने देण्यात आले. रविवारी (दि. 10) चिंचवड येथील एका कार्यक्रमात हे निवेदन देण्यात आले.

यावेळी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, संघाचे मुकेश चुडासमा, निर्मला माने, शरद चव्हाण, नंदु भोगले उपस्थित होते.

त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे अधिकारी, पुणे जिल्ह्यातील सर्व खासदार, राज्यसभा सदस्य, आमदार पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिकेचे आयुक्त यांना मेट्रो सेवा निगडी ते कात्रजपर्यंत व्हावी यासाठी चिंचवड प्रवासी संघाच्यावतीने लेखी निवेदन देण्यात येणार आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.