Chinchwad: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  डेटॉल लिक्वीड, साबणाची चोरी

एमपीसी न्यूज –  कोरोना विषाणूने थैमान घातल्याने सध्या डेटॉल साबणासह लिक्वीडला बाजारात मोठी मागणी आहे. बंद मेडिकलचे शटर उचकटून चोरट्याने डेटॉल लिक्वीड, साबणाची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना पवनानगर येथील गुरूराज मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स येथे गुरूवारी रात्री घडली.  

याप्रकरणी योगेश रमेशलाल बाफना (वय 41, रा. केशवनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाफना यांचे पवनानगर येथे  गुरूराज मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स आहे. गुरूवारी रात्री त्यांनी मेडिकल आठ वाजता बंद केले. त्यानंतर  चोरट्याने बंद मेडिकलचे शटर उचकटून  डेटॉल लिक्वीड, साबण, पर्स, परफ्युमच्या बाटल्या, चॉकलेट आणि रोकड असे साडेनऊ हजारांचे साहित्य चोरून नेले.

शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like