Chinchwad: देवस्थान ट्रस्टतर्फे कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी ससून हॉस्पिटलला 21 लाखांची मदत

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या लढ्यासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्टने मदतीचा हात पुढे केला आहे. ट्रस्टने कोरोना विषाणूमुळे पीडित रूग्णांची सेवा करण्यासाठी पुणे येथील ससून हॉस्पिटलला एकवीस लाख रुपयांची मदत दिली आहे. त्याबाबतचा धनादेश आज (मंगळवारी) देण्यात आला आहे.

याबाबतची माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज, विश्वस्त विश्राम देव यांनी दिली.

संपूर्ण जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असून मोठे संकट ओढवले आहे. देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. या संकटावर मात करण्यासाठी पुण्याच्या सह धर्मादाय आयुक्त देशमुख यांनी देवस्थानला मदत करण्याचे आवाहन केले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत चिंचवड देवस्थान ट्रस्टने आर्थिक मदत केली आहे. कोरोना विषाणूमुळे पीडित रूग्णांची सेवा करण्यासाठी पुणे येथील ससून हॉस्पिटलला एकवीस लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश ट्रस्टने दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.