Chinchwad : रशियातील माउंट एल्बूस शिखर सर करायला निघाला लातूरचा गिर्यारोहक

एमपीसी न्यूज – मूळचा लातूर येथे राहणारा व सध्या पुण्यात स्थानिक असलेला दीपक कोनाले हा युरोप मधील माउंट एल्बस हे शिखर सर करण्यासाठी गेला आहे. ही मोहीम 1 जुलै पासून सुरू झाली असून 7 जुलै रोजी शिखराच्या माथ्यावर भारताचा तिरंगा व महाराष्ट्र राज्याचे अस्मितेचे प्रतीक असलेला भगवा ध्वज व राष्ट्रगान गाऊन अनोखी मानवंदना देणार आहे.

माउंट एल्बूस हे रशियातील सर्वात उंच शिखर आहे. याची समुद्र सपाटीपासून उंची 5642 मीटर(18510 फुट आहे. हे शिखर काळा समुद्र व कॅस्पियन समुद्र यांच्यामध्ये आहे. या शिखराचे वैशिष्ट म्हणजे हा एक निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत आहे. येथील तापमान उणे 25 डिग्री पर्यंत खाली जाते. वर्षभर येणारी सततची वादळे व हाडे गोठविणारी थंडी हे या शिखरावरील चढाईच्या मुख्य अडचणी आहेत.

दीपकच्या मोहिमेचा फ्लॅग ऑफ पिंपरी-चिंचवडचे उद्योजक नंदकुमार साळुंखे व गिर्यारोहण क्षेत्रातील एव्हरेस्टवीर सुरेंद्र शेळके यांच्या हस्ते नुकताच चिंचवड येथे करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.