BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : लोकलमधून पडल्याने अपंग इसमाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – लोणावळा-पुणे लोकल मधून पडल्याने एका अपंग इसमाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 1) रात्री पावणेनऊच्या सुमारास आकुर्डी-चिंचवडच्या दरम्यान घडली.

मृत्यू झालेल्या इसमाची अद्याप ओळख पटली नाही. मृत्यू झालेल्या व्यक्तीचा रंग काळा-सावळा, वय अंदाज 50-55 वर्षे, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व पांढऱ्या रंगाचा पायजमा घातला असून जवळ कुबडी सापडली आहे. उजव्या हातावर मोरांचे चित्र गोंदलेले असून, चिंचवड रेल्वे पोलिसांनी मृतदेह यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात ठेवला आहे.

वरील वर्णनाच्या व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास पोलीस कॉन्स्टेबल अनिल बागुल (8329382803) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like