Chinchwad : घृणास्पद ! आजी-आजोबाचे अश्लील चाळे; नातेवाईकाकडून बलात्कार

पीडित मुलीचे आजोबा यांनी पीडीत मुलीसोबत गैरवर्तन केले. Disgusting! Grandparents' obscene To behave; Rape by a relative

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीसमोर आजी आणि आजोबा यांनी अश्लील चाळे केले. त्यांचे अश्लील चाळे अल्पवयीन नातीला जबरदस्तीने बघायला लावले. तसेच मावशीच्या पतीने पीडित मुलीला त्याच्या गावाला नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 2014 पासून 2020 पर्यंत वेळापूर, पंचशिल नगर व म्हसवड येथे घडली.

फिर्यादी यांची सख्खी आजी व आजोबा यांनी फिर्यादीच्या समोरच शारीरिक संंबंध प्रस्थापित केले. ते पाहण्यास फिर्यादीस बळजबरी केली. याला फिर्यादीने नकार दिल्यानंतर तिला मारहाण व शिवीगाळ केली.

तसेच पीडित मुलीचे आजोबा यांनी पीडीत मुलीसोबत गैरवर्तन केले. फिर्यादीने याविषयी आजीला सांगितले असता तिने याकडे दुर्लक्ष केले. याबाबत कोणाला काही न सांगण्याची धमकी आजीने दिली.

पीडित फिर्यादीच्या मावशीच्या पतीने पीडीतेला गावाला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

पीडित मुलीच्या दुसऱ्या आजीने याबाबत फाउंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन मुस्कान या संस्थेकडे तक्रार केली. संस्थेच्या माध्यमातून चिंचवड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, हा प्रकार माळशिरस येथे घडला असल्याने हा गुन्हा माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे वर्ग करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.