Chinchwad: सामाजिक संस्थांच्यावतीने निराधारांसह, गरजूंना धान्य वाटप, अन्नदान

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाउन लाग केल्याने पिंपरी चिंचवड शहर परिसरातील गोरगरिबांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर काही सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधींकडून जीवनावश्यक वस्तूंची या गोरगरिबांना मदत केली जात आहेत.

नगरसेविका नम्रता लोंढे यांच्याहस्ते सफाई महिला कामगारांना धान्य किट

कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव पाहता स्वतःची आणि सभोवतालच्या परिसरात स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. या सामाजिक जाणीवेतून भोसरी  बालाजीनगर व खंडे वस्ती परिसरातील दररोज रस्ते साफ करणाऱ्या 80 महिलांना नगरसेविका नम्रता लोंढे व योगेश लोंढे यांनी यांच्यावतीने स्व:खर्चातून  प्रत्येकी २ किलो तांदुळ व भाजीपाल्याचे वाटप केले.

शासकीय मदतीची वाट न पाहता त्यांनी  केलेल्या  या मदतीने गोरगरीब जनता भारावून गेली. तसेच मदत मिळालेल्या नागरिकांनी त्यांचे आभारही मानले.

या वेळी नगरसेविका नम्रता लोंढे, योगेश लोंढे, सागर ओरसे, रुपेश लोंढे, पिंटु जाधव, दिपक लवटे, शिवाजी गुरव, गोविंद चुनचुने, अक्षय नागनसुर, धनाराम जाट आदी उपस्थित होते. यासाठी राजेश आगरवाल,भंडारी काका, कानिफनाथ भुजबळ, बाळासाहेब भुंजे, यांचे सहकार्य लाभले.

श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे  धान्य किटचे वाटप

चिंचवड, शिवतेजनगर येथील  गोरगरीब नागरिकांना श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे धान्य किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळ, साखर, तेल, मसाला, गूळ आदी साहित्याचा समावेश आहे. श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, मंगेश पाटील यांच्या हस्ते गरजू व्यक्तीला धान्य किट देण्यात आली.


देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्या कारणाने नागरीकांना पैशाची चणचण भासत आहे. तसेच लोकांना घरा बाहेर पडता येत नसल्याने दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी अडचण निर्माण होत आहे. कोरोना पासून बचावासाठी सार्वजनिक स्वच्छता सुद्धा महत्त्वाची आहे त्यामुळे सामाजिक जाणीवेतून आसपासचे रस्ते दररोज झाडणार्या 80 महिलांना नगरसेविका नम्रता लोंढे व योगेश लोंढे यांच्या वतीने प्रत्येकी २ किलो तांदुळ व भाजीपाला यांचे वाटप करण्यात आले.

शिवसैनिकांनी भरविला भुकेल्यांना मायेचा घास

‘लॉकडाउन’च्या कालावधीत सर्व हॉटेल बंद असल्याने बेघर व निराधारांचे अन्नपाण्यावाचून प्रचंड हाल होत आहे. त्यांची ही अवस्था पाहून शिवसेना मावळा तालुका समन्वयक रमेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जेष्ठ शिवसैनिक देवा कांबळे, विलास हिणूकले, जयेन नायर, लालचंद शर्मा, व्यापारी कैलास ठाकूर, प्रकाश महासे, सागर मुंडास, विनोद कर्डीले आदींच्या हस्ते त्यांना चहा, पाणी आणि जेवण देण्यात येत आहे.

गेल्या सहा दिवसामध्ये दररोज पन्नास  या प्रमाणे तीनशे निराधारांना मायेचा घास भरविण्यात आला. यापुढेही शहरात कुणी भुकेले आढळल्यास त्यांना जेवणाची व्यवस्था केली जाईल, अशी माहिती रमेश जाधव यांनी दिले.

 

पिंपरी युवासेना व आशीर्वाद महिला संघाकडून सफाई कामगारांना भोजन


कोरोनाचा संसर्ग वाढू नये, या साठी नियमित साफसफाई करणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना पिंपरी युवासेना व आशीर्वाद महिला संघाकडून मोफत भोजन देण्यात आले.

दापोडी -फुगेवाडीमधील सर्व सफाई कामगारांना या भोजनाचा लाभ मिळाला. या वेळी पिंपरी युवासेनेचे विभाग संघटक निलेश हाके, आशीर्वाद महिला गटाच्या शीला जाधव, रोहित गोरे, रमेश जगताप, महेश बोधले, अंजन बंगारी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.