Chinchwad: दिव्यांगांची मतदान जनजागृती फेरी; दीडशे विद्यार्थ्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज – चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघ यांच्या संयुक्‍त विद्यमाने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह ते क्रांतीवीर चापेकर चौक दरम्यान दिव्यांगांची मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली. दिव्यांगांच्या विविध शाळांमधील 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

निवडणुकीत दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा, तसेच त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाने तयार केलेल्या पी.डब्ल्यू.डी या ऍपचा प्रसार व्हावा, या उद्देशाने ही फेरी काढण्यात आली. चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राधिका हावळ, दिव्यांग नोडल अधिकारी संभाजी ऐवले, सहाय्यक स्वप्निल भालेराव, कोमल टिके, समन्वयक गणेश टिळेकर, हनुमंता पुंडा तसेच पिंपरी विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी सुनील वाघमारे, स्वीप कमिटी प्रमुख आण्णा बोदडे, नोडल अधिकारी बापूसाहेब गायकवाड, दिव्यांग नोडल अधिकारी रामकृष्ण आघाव, सहाय्यक बाळासाहेब गंधट, स्वीप अधिकारी मुकेश कोळप, समन्वयक भाऊसाहेब कांबळे उपस्थित होते.

पथनाट्य सादर करून फेरीला सुरुवात झाली. तसेच दिव्यांग मतदारांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन मतदान करावे, यासाठी शपथ देण्यात आली. या फेरीमध्ये चिंचवड बधीरमूक विद्यालय (निगडी), कामायनी मतिमंद विद्यालय (निगडी), साई संस्कार मतिमंद मुलांची शाळा (चिंचवड), ब्रम्हदत्त मतिमंद विद्यालय (निगडी), अपंग विद्यालय (निगडी), अंध कार्यशाळा (चिंचवड) या शाळांतील विद्यार्थी, शिक्षक तसेच प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाघचौरे, कर्णबधिर असोसिएशनचे अध्यक्ष परशुराम बसवा, गणेश कानपिळे, झुंज अपंग संस्थेचे प्रतिनिधी बाळासाहेब तरस सहभागी झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.