Chinchwad: चिंचवडमध्ये रंगली ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ मैफल!

एमपीसी न्यूज – दिवाळीनिमित्त चिंचवड येथे भाऊसाहेब भोईर यांच्या निवासस्थानी मधुमिक निर्मित व मानसी भोईर प्रस्तुत ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ ही भक्तीगीत, भावगीत, मराठी व हिंदी चित्रपट गीतांची सुरेल मैफल रसिकांची दाद मिळवून गेली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिभा इनामदार यांनी गगन सदन तेजोमय हे गीत सदर केले. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या जाऊ देवाचिया गावा या अभंगाने मधुसूदन ओझा यांनी सुरुवात केली. यानंतर प्रतिभा इनामदार, आर्या काकडे, अमोल यादव आणि सार्थक  भोसले यांनी वेगवेगळी गाणी गाऊन प्रेक्षकांची मने जिंकली.

त्यानंतर मानसी भोईर आणि मधुसूदन ओझा यांनी ‘माळ्याच्या मळ्यामंदी कोण गं उभी…” हे द्वंद्व गीत सादर केले. त्यानंतर आर्या काकडे यांनी श्रेया घोशाल यांनी गायलेले ‘अधीर मन झाले…’ तसेच सार्थक भोसले याने ‘देवक काळजी रे…’ ही गीते सादर केली. यामध्ये प्रतिभा इनामदार यांनी ‘झोंबतो गारवा…’ मानसी भोईर यांनी ‘हमरी अटरिया पे…’ आणि मधुसूदन ओझा यांनी यावेळी सादर केलेल्या ‘मेरे रशके कमर…’ गाण्याला उत्स्फूर्त ‘वन्स मोअर’ मिळाला.

_MPC_DIR_MPU_II

त्यानंतर कार्यक्रमाचे आयोजक श्री. भाऊसाहेब भोईर यांनी ‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना… ‘ हे गीत आणि ‘जो तुमको हो पसंद’ हे हिंदी चित्रपट गीत सादर करून रसिकांची दाद मिळवली.

उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या या कार्यक्रमात शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून ‘म्यानातून उसळे तलवारीची पात…’ या वीरगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास परिसरातील लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

यावेळी भाऊसाहेब भोईर, हर्षवर्धन भाऊसाहेब भोईर, किरण हर्षवर्धन भोईर, मानसी भाऊसाहेब भोईर आणि मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1