Chinchwad: अनधिकृत बांधकामे होऊ देऊ नका, त्याचे समर्थन करू नका – मुख्यमंत्री

 शास्तीची धास्ती 15 दिवसांत घालविणार;  पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रश्न सामंजस्याने मार्गी लावू    

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामे होता काम नये. अनधिकृत बांधकामचे समर्थन करणे चुकीचे आहे असे सांगत शहरातील शास्तीकराचा प्रश्न आगामी 15 दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प मार्गी लागण्याबाबत मी स्वतः लक्ष घातले आहे. मावळातील शेतक-यांशी चर्चा करून, त्यांच्या समस्या मार्गी लावून जलवाहिनीचा प्रश्न सामंजस्याने सोडविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे उभारण्यात येणा-या  पंतप्रधान आवास योजना, स्मार्ट सिटीतील कामांचे आज(बुधवारी) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘ई-भूमिपुजन’ करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर राहुल जाधव, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चौबुकस्वार, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन  यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

”आमदार, पदाधिका-यांनी शास्तीची इतकी धास्ती घेतली आहे की दररोज मला एक संदेश पाठवता. त्यामुळे मला मनातून शास्तीकर माफ तर करायचा आहेच पण तुमच्या संदेशच्या तगाद्यामुळे शास्तीचा निकाला लावयाचा ठरवले असल्याचे सांगत” मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ”येत्या 15 दिवसात शास्तीकरा संदर्भातील निर्णय मंत्रीमंडळाचा बैठकीत घेतला जाईल. सामान्य मानसाला दिलासा मिळाला पाहिजे, असा प्रकारचा निर्णय घेवू पण त्यासोबत कुठेही अनधिकृत बांधकामाला मी समर्थन देतोय, त्याचा पाठपुरावा करतोय, अशी परिस्थिती येवू नये, याची काळजी घेतली पाहिजे”.

”भविष्यात अनधिकृत बांधकामे तयार होणार नाहीत. याकडे मोठ्या प्रमाणात लक्ष देण्याची आवश्यकता आहे. साडेबारा टक्के परतावा, एमआयडीसी संदर्भातील निर्णय देखील मार्गी लावणार आहोत. त्याची फाईल आपल्याकडे आली आहे. त्याच्यामध्ये काही आव्हाने असून ती दूर करावी लागतील”, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

”पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी मावळच्या शेतक-यांसोबत चर्चा करणे आवश्यक आहे. दोन पाईपलाईन टाकल्या जाणार आहेत. शेतक-यांच्या सिंचनाची वेगळी पाईपलाईन टाकून दिली जाईल. पिण्याच्या पाण्याची वेगळी आणि शेतक-यांच्या जमीनीपर्यंत सूक्ष्म सिंचन पद्धतीने त्यांना पाणी देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात ओपन पाईपलाईन बंद करण्यात आल्या असून 1700 किलोमीटर बंद पाईपलाईनचे काम सुरु केले आहे. त्यामुळे मावळातील शेतक-यांचे प्रश्न सोडविले जातील. त्यांच्या शेतीला पाणी मिळाले पाहिजे. चांगल्या पद्धतीने मिळाले पाहिजे. शेती करता आली पाहिजे”, असेही ते म्हणाले.

”मावळ आंदोलनात ज्यांच्यावर अत्याचार झाला, जे शहिद झाल्या. त्यांच्या कुटुंबाना सामावून घेणे आवश्यक आहे. त्यांना नोकरी देवून सामावून घेणे गरजेचे आहे. त्यांचे झालेले नुकसान कुठल्याच पद्धतीने भरुन देवू शकत नाही. परंतु, किमान संवेदनशीलपणे त्यांच्या पाठिशी उभा राहिले पाहिजे. या सर्व गोष्टीबाबत त्यांच्याशी चर्चा करुन पवना बंदिस्त जलवाहिनेचे काम सहमतीने कसे पुर्ण करता येईल. यासंदर्भात मी स्वत:, पालकमंत्री गिरीश बापट यांनी लक्ष घातले असून ते काम देखील पुर्ण मार्गी लावले जाईल. हा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर शहराच्या पिण्याच्या पाण्याची अडचण दूर करता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.