BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : विरोधकांच्या टिकेला घाबरणार नाही – पार्थ पवार

'तुमचा आशीर्वाद व प्रेम असेच राहू द्या' जनतेला भावनिक साद 

INA_BLW_TITLE
एमपीसी न्यूज -विरोधकांनी कितीही टीका केली तरी त्याला घाबरणार नाही. तुमचे आशीर्वाद आणि तुम्ही दाखवलेला विश्वास हाच माझा मोठा विजय आहे. तुमचा आशीर्वाद व प्रेम असेच राहू द्या अशी भावनिक साद घालत राष्ट्रवादी- काँग्रेस महायुतीचे मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार यांनी आपणच विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. पार्थ पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते बोलत होते. 
यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, जय पवार, माजी नगरसेवक राजू मिसाळ आदी उपस्थित होते.
  • अजित पवार म्हणाले, “देशाचा संपूर्ण कारभार कोणाच्या हाती द्यायचा हा प्रश्न जनताच सोडवील. नोटाबंदी, जीएसटी, आर्थिक दिवाळखोरी मुले सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. याचा एकही उल्लेख सत्ताधा-यांनी दिलेल्या जाहीरनाम्यामध्ये  केला नाही.  महापालिका, राज्य सरकार व केंद्र सरकारमध्ये भाजपाचेच सरकार असूनही पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोन, अनधिकृत बांधकाम, शहराला बंद जलवाहिनीव्दारे पाणीपुरवठा, बोपखेल गावासाठी दळणवळण यंत्रणा हे प्रश्न देखील अद्यापपर्यंत भाजपाला सोडविता आले नाहीत.
पाच वर्षापूर्वी नरेंद्र मोदी विकासाबद्दल बोलयचे आता हेच विकासाच काहीच बोलत नाही. याचा विचार सर्वसामान्य मतदारांनी विचार करायला हवा. त्यामुळे योग्य उमेदवाराला साथ द्या असे आवाहन त्यांनी केले.
HB_POST_END_FTR-A2

.