Chinchwad : विवाहितेच्या छळ प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज- वारंवार पैशाची मागणी करून विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिंचवड येथे घडली.

शशिकांत सुनील कदम (वय 31), सुनील रघुनाथ कदम (वय 40) आणि लक्ष्मी सुनील कदम (वय 40, सर्व रा. सारसनगर, अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 30 वर्षीय विवाहितेने मंगळवारी (दि. 15) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 27 मे 2017 ते 14 ऑक्‍टोबर 2019 या कालावधीत घडली. आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांनी माहेराहून पैसे आणावेत यासाठी शाररीक व मानसिक छळ करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक आटवे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.