Chinchwad : पैस रंगमंच व थिएटर वर्कशॉप कंपनीतर्फे महिला दिनानिमित्त एकपात्री व लघुनाटिका स्पर्धा

एमपीसी न्यूज- पैस रंगमंच व थिएटर वर्कशॉप कंपनीच्या वतीने महिला दिनानिमित्त खास मुली व महिलांसाठी ‘व्यक्ती अभिव्यक्ती’ एकपात्री व लघुनाटिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 14 व 15 मार्च रोजी या स्पर्धा होणार असून या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी 5 मार्चपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

शनिवारी 14 मार्च रोजी सकाळी 8 ते 1 या वेळेत 5 ते 15 वयोगटासाठी तर दुपारी 4 ते 8 या वेळेत 16 वर्षावरील वयोगटासाठी एकपात्री अभिनय स्पर्धा होणार आहेत. 5ते 15 वयोगटासाठी 200 रुपये तर 16 वर्षावरील गटासाठी 350 रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे.

रविवारी 15 मार्च रोजी लघुनाटिका स्पर्धा होणार असून त्यासाठी 700 रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी 15 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह, प्रशस्ती पत्रक व रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. शिवाय विशेष लक्षवेधी अभिनय, लेखन आणि संघालाही पारितोषिके देण्यात येतील. प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी रश्मी घाटपांडे ९९६०३१११४१ व अमृता ओंबळे ९६५५२८६९६४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.