Pimpri News : कोरोना काळात पोलिसांच्या वारंवार शारीरिक तपासण्या होणं गरजेचं – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

पोलिसांसाठी 'एचए'तर्फे आरोग्य तपासणी शिबिरास सुरुवात; पहिल्या दिवशी सुमारे 200 पोलिसांची तपासणी

एमपीसी न्यूज – पोलिसांनी आहार व व्यायामासाठी वेळ द्यायला हवा. पोलीस सतत नागरिकांच्या संपर्कात असतात. कोरोना साथीच्या काळात पोलिसांच्या वेळोवेळी शारीरिक तपासण्या होणे आवश्‍यक आहे. सध्या पोलीस वॉरिअरच्या भूमिकेत आहेत. जीवाची पर्वा न करता अहोरात्र ते काम करीत आहेत, असे मत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णा प्रकाश यांनी व्यक्त केले.

पिंपरीतील हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍स (एचए) कंपनीतर्फे पिंपरी चिंचवड पोलिसांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येत आहे. या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी (बुधवारी, दि. 16) पोलीस आयुक्त बोलत होते. हे शिबिर 3 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

शिबिराच्या उदघाटन प्रसंगी अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील, एचएएलचे प्रतिनिधी डीजीएम-फायनान्स सी. व्ही. पुरम, डीजीएम-ऑपरेशन्स अनुज कुमार सिंह, एचएलचे जनसंपर्क अधिकारी अविनाश थोपटे, वितरण विभागचे आनंद यादव, टेक्‍निकल विभागाचे इनचार्ज अभय अगरवाल आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरीतील हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍स कंपनीतर्फे पिंपरी चिंचवड शहरातील तीन हजार पोलिसांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यामुळे पोलिसांचा फिटनेस समजण्यास मदत होणार आहे. अनेक पोलिसांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे पूर्वखबरदारी म्हणून एचए कंपनीने पुढाकार घेऊन हा उपक्रम राबवला आहे.

एचए कंपनीने उत्पादित केलेल्या ‘क्‍लिनिक ऑन क्‍लाऊड’ मशीनवर एकूण 23 प्रकारच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या जाणार आहेत. यामध्ये वजन, बॉडी फॅट, मधुमेह, रक्तदाब, बीएमआय, बीएमआर, मसल्स, मास प्रोटीन, हिमोग्लोबिन, ताप, नाडी, डोळे तपासणीसह एमआरआय तपासणी केली जाणार आहे. पहिल्या दिवशी सुमारे 200 पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

‘पोलिस नागरीकांसाठी अहोरात्र पहारा देत आहेत. जिथं कोणीही लवकर पोहचत नाही अशा ठिकाणी आमचा पोलीस बांधव सेवा देत असतो. हा आमच्या कर्तव्याचा भाग असून ते कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी सध्या पोलीस चोखपणे पार पाडत आहेत. अशा कठीण परिस्थितीत पोलिसांचे शारीरिक स्वास्थ्य जपण्याचे काम एचए कंपनीने केले आहे’. कृष्णा प्रकाश – पोलीस आयुक्त.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.