Chinchwad : जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलीस, डॉक्टर यांचा सन्मान

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी एकता सोशल फौंडेशन व पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे महिला पोलीस, महिला डॉक्टर तसेच गृहिणी व सफाई कामगार यांचा सन्मान करण्यात आला. महिलांना श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

 

यावेळी चिंचवड पोलीस स्टेशनच्या पोलीस कॉन्स्टेबल ज्योती सोनवणे, एकता सोशल फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष अक्षय शिंदे, उपाध्यक्ष कृष्णा गायकवाड, गणेश नाईकनवरे, आकाश दौंडगव, तुकाराम सुरवसे,सखाराम सुरवसे, गणेश मानवतकर  व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 

चिंचवड पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल, चव्हाण हॉस्पिटल व वायसीएम हॉस्पिटलच्या महिला ड्राक्टर, वाहतूक विभागाच्या महिला अधिकारी, महिला सफाई कामगार व गृहिणींचा श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.