BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad: पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ शेकापच्या वतीने कोपरा सभा

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ शेकापच्या वतीने चिंचवड, लक्ष्मीनगर वाल्हेकरवाडी येथे विजय संकल्प कोपरा सभा चर्चासत्र घेण्यात आले.

या सभेत ज्योतिबा नगर, काळेवाडी, बौध्दनगर पिंपरी येथील महिला व तरुण यांच्याशी चर्चा करण्यात आली. शेतकरी कामगार पक्षाचे शहराध्यक्ष नितीन बनसोडे, शेतकरी कामगार पक्ष महिला शहराध्यक्ष छायावती देसले, शेतकरी कामगार पक्ष उपशहर अध्यक्ष भालचंद्र नाना फुगे, शेतकरी कामगार पक्ष कार्याध्यक्ष हरीश मोरे,राहुल पडवळ, सीता जगताप, सनी लाड महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष नितिन बनसोडे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरातील खंडित झालेला विकास पूर्ववत करण्यासाठी सत्ता परिवर्तन झाले पाहिजे. त्यासाठी पार्थ पवार यांना निवडून आणण्याचे आवाहन केले.

शेतकरी कामगार पक्षाच्या महिला शहराध्यक्ष छायावती देसले म्हणाल्या, “सत्ताधाऱ्यांचा महिलांविषयीच्या प्रतिक्रिया पाहता परिवर्तन घडवण्यासाठी सहभागी होण्याची संधी मिळाली आहे आणि या संधीचे रूपांतर पार्थ पवार यांना निवडून आणून द्यायचे आहे”

अनधिकृत बांधकाम, रिंग रोड बाधित नागरिकांना त्यांचा राग त्यांचा रोष प्रकट करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे भूमिका शेतकरी कामगार पक्षाचे उपाध्यक्ष भालचंद्र नाना फुगे यांनी मांडली.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.