Chinchwad Crime News : संगणकाचा पासवर्ड चोरून विद्यार्थ्यांच्या स्टायपेंडचा अपहार ; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – ॲकॅडमीच्या संगणकाचा पासवर्ड चोरून विद्यार्थ्यांच्या माहितीमधील अकाउंट नंबर बदलून विद्यार्थ्यांच्या नावाने आलेला स्टायपेंड स्वतःच्या नावावर घेतल्याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार 20 एप्रिल ते 15 मे या कालावधीत आयआयएमएस बिल्डिंग, रामकृष्ण मोरे सभागृहाजवळ, चिंचवड येथे घडला.

प्रसाद प्रभाकर शाळीग्राम (वय 41, रा. बुधवार पेठ, पुणे) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अरुणा राजेंद्र टिकरे (रा. भवानी पेठ, रामोशी गेट, पुणे), जोगेश्वरी विक्रांत भिंगे (रा. पाषाण, पुणे) आणि अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची चिंचवड येथे खाजगी ॲकॅडमी आहे. ॲकॅडमीच्या संगणकामधील डेटाबेसमध्ये फिर्यादी यांच्या परवानगीशिवाय आरोपींनी पासवर्ड चोरून संगणकाचा ॲक्सेस घेतला.

त्यात असलेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीमधील अकाउंट नंबरमध्ये बदल करून विद्यार्थ्यांची स्टायपेंडची 28 हजार 937 रुपये रक्कम आरोपी अरुणा आणि जोगेश्वरी यांनी त्यांच्या खात्यामध्ये घेतली.

याप्रकरणी फिर्यादी आणि विद्यार्थी यांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.