Chinchwad : ‘इकॉलॉजी’ या पर्यावरणविषयक वेबसाईटचे पर्यावरणदिनी लॉन्चिंग

Environment Day launch of ecology website

एमपीसीन्यूज : पर्यावरण, वन्यजीव व त्यांचे संवर्धन यांच्याविषयी आंतरराष्ट्रीय कायदे व कायद्यातील तरतुदी काय आहेत यांची माहिती लोकांना व्हावी या उद्देशाने अॅड. प्रतीक गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी एक वेबसाईट तयार केली आहे.

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (५ जून) या www.ecolawgy.net या वेबसाईटचे व्हर्च्युअल लॉन्चिंग झाले. यावेळी पिंपरी चिंचवडच्या महापौर माई उर्फ उषा ढोरे विशेष उपस्थित होत्या.

इकॉलॉजी या वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जागरुकता निर्माण करणे, त्याचबरोबर पर्यावरणविषयी आंतरराष्ट्रीय शोधनिबंध, लेख यांचा उहापोह करुन वातावरणातील बदल, प्रदूषण यांची माहिती देऊन निसर्ग, पर्यावरण, वन्यजीव रक्षक यांना एक हक्काचे व्यासपीठ तयार करुन देण्यात येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्यासंबंधी आंतरराष्ट्रीय कायदे व त्यातील तरतुदी याची माहिती देणे हा देखील इकॉलॉजी या कायदेविषयक वेबसाईटचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती यावेळी अॅड. प्रतीक कुंडलिक गावडे यांनी दिली.

अॅड. गावडे यांच्यासह या वेबसाईटच्या माध्यमातून सुमारे ३५ कायदेक्षेत्राशी संबंधित युवक युवती एकत्र आले आहेत. पुढीलकाळात एक निबंध स्पर्धा देखील घेतली जाणार आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी अभ्यास आणि जनजागृती या माध्यमातून वशेष काम करण्यात येणार आहे.

अॅड. गावडे यांनी लंडन येथील क्वीनमेरी विद्यापीठातून एल. एल. एम. ही मास्टर्सची पदवी प्राप्त केली असून त्यांनी जागतिक पर्यावरणविषयक कायदे या विषयाचा सखोल अभ्यास केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1