Chinchwad : प्रत्येक शनिवार असेल ‘तक्रार निवारण दिन’,पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे आदेश

एमपीसी न्यूज – केंद्र शासन, राज्य शासन तसेच पोलीस आयुक्तालय स्तरावर विविध (Chinchwad) माध्यमातून आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी तक्रार निवारण दिन आयोजित करण्याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक शनिवारी सकाळी साडेदहा ते दुपारी दोन या कालावधीत वरिष्ठांच्या उपस्थितीत प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार निवारण दिन साजरा होणार आहे. यामध्ये नागरिकांच्या तक्रारींचे प्रत्यक्ष निरसन केले जाणार आहे.

नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निरसन होण्यासाठी विविध माध्यमातून तक्रारी स्वीकारल्या (Chinchwad)जातात. वेब पोर्टल, व्हाट्सअप, ई-मेल, प्रत्यक्ष पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस उपायुक्त कार्यालय, सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस ठाण्यांमध्ये,त्यासह राज्य शासनाचे आपले सरकार पोर्टल,केंद्र शासनाचे पी जी पोर्टलच्या मार्फत या तक्रारी पोलिसांकडे येत असतात. आलेल्या तक्रारींचे वेळेत निराकरण झाल्यास नागरिकांना न्याय मिळण्यास मदत होते. तक्रारीचे वेळेत निरसन न झाल्यास नागरिकांची गैरसोय होते.

Moshi : मोशीत सुसाट्याच्या वाऱ्यानं होर्डिंग कोसळलं, सुदैवाने जिवीतहानी नाही

नागरिकांची ही गैरसोय टाळण्यासाठी तसेच नागरिकांना अधिकाऱ्यांकडे आपली कैफियत मांडता यावी, त्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी तक्रार निवारण दिन हा उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक शनिवारी सकाळी साडेदहा ते दुपारी दोन या कालावधीत पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या तक्रारी सोडविल्या जाणार आहेत.

प्रत्येक शनिवारी सकाळी साडेदहा वाजता नागरिकांनी आपल्या तक्रारींसह पोलीस ठाण्यांमध्ये हजर राहण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.