Chinchwad : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे –  सुधीर हिरेमठ 

Chinchwad: Everyone should follow guidelines to prevent corona outbreak - DCP Sudhir Hiremath चिंचवड येथील प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीजच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील पोलिस दलासाठी मास्कचे वाटप करण्यात आले.

एमपीसी न्यूज – कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले. 

चिंचवड येथील प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीजच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील पोलिस दलासाठी मास्कचे वाटप करण्यात आले. त्यावेळी हिरेमठ बोलत होते.

कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मास्क वाटप करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, क्रीडा अधिकारी डॉ. आनंद लुंकड, मुख्य प्रशासकिय अधिकारी, डॉ. राजेंद्र कांकरीया, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी अरविंद बोरगे, एमबीए विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे आदी उपस्थित होते.

पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी विद्यार्थी व शिक्षकांना कोरोनापासून बचावासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच सर्वांनी शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. संस्थेने पोलीस दलासाठी केलेल्या मदतीबद्दल हिरेमठ यांनी  संस्थेचे आभार मानले.

डॉ. राजेंद्र कांकरीया यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे यांनी पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांचे स्वागत केले. प्राध्यापक नव्या दंडवाणी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी शनेश्वर स्वामी, ओंकार मांडगे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.