Chinchwad : गियर उत्पादन क्षेत्रातील 75 कंपन्यांच्या प्रदर्शनास ऑटो क्लस्टरमध्ये सुरुवात

एमपीसी न्यूज – भारतीय औद्योगिक क्षेत्रातील गिअर उद्योगाला (Chinchwad)प्रोत्साहन देणारे गियर उत्पादन उद्योगाचे इंटरनॅशनल पॉवर ट्रान्समिशन एक्स्पो (IPTEX24), इंटरनॅशनल एक्स्पो ऑन ग्राइंडिंग आणि फिनिशिंग प्रेसेस (GRINDEX24) आणि गिअर टेक्नॉलॉजी इंडिया (GTI) समिट 2024 चिंचवड मधील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे गुरुवार (दि. 22) ते शनिवार (दि. 24) या कालावधीत होत आहे.

या औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे(Chinchwad) संचालक एस डी गराडे यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात देश, विदेशातील 75 पेक्षा अधिक गियर उद्योग क्षेत्रातील सदस्य सहभागी झाले आहेत.

इंटरनॅशनल पॉवर ट्रान्समिशन एक्स्पो (IPTEX) गियर्स आणि मेकॅनिकल पॉवर ट्रान्समिशन उद्योगासाठी भारतातील एकमेव ट्रेड शो आणि व्यासपीठ आहे. एक्स्पो मध्ये अमेरिकन गियर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (AGMA) आणि स्मॉल अँड मीडिअम (SME) एंटरप्रायजेस चेंबर ऑफ इंडिया यांचाही सहभाग आहे. IPTEX सह ग्राइंडिंग आणि फिनिशिंग प्रक्रियेसाठीशी संबंधित GRINDEX या आंतरराष्ट्रीय एक्स्पोचा सहभाग आहे.

Talegaon Dabhade : शहराच्या विकासात दाभाडे घराण्याचे मोठे योगदान – रवींद्र दाभाडे

या प्रदर्शन आणि चर्चासत्रांमध्ये वरील क्षेत्रांतील ७५ पेक्षा अधिक प्रदर्शक सहभागी होत आहेत. ऑटोमोबाईल, एरोस्पेस, संरक्षण उपकरणे, मरीन, मशीन टूल्स, मटेरियल हाताळणी, सिमेंट उद्योग यासारख्या 50 हून अधिक उद्योगांचे प्रतिनिधी औद्योगिक क्षेत्रातील अभ्यागतांचे स्वागत करतील. या तीन दिवसीय कार्यक्रमात गियर टेक्नॉलॉजी इंडिया (GTI), भारतीय गियर उत्पादन उद्योगासाठी एकमेव डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मसह एक विशेष शिखर परिषद देखील आहे.

या GTI समिटमध्ये सहभागी कंपन्यांकडून त्यांच्या उत्पदनांचे सादरीकरण केले जाणार आहे. तसेच या क्षेत्रांमधील तज्ञांचे चर्चासत्र, परिसंवाद आणि गियर उत्पादकांसाठी ‘फायरसाइड चॅट’ होईल. ज्यामध्ये गियर उत्पादन उद्योगातील प्रख्यात वक्ते सहभागी होणार आहेत.

याशिवाय भारतीय गीअर उद्योगात प्रभावी कामगिरी आणि योगदान देणाऱ्या उद्योगाचा प्रथमच गियर मॅन्युफॅक्चरिंग फॉर बिझनेस अँड एक्सलन्स अचिव्हमेंट अवॉर्ड’ देऊन गौरव करण्यात येणार आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.