Chinchwad : आयआयसीएमआरमध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम

एमपीसी न्यूज- औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेच्या ‘इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल अँड कॉम्पुटर मॅनॅजमेन्ट इथे एम सी ए प्रोग्रामचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, सावित्रीबाई फुले व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व सिनेट डॉ. महेश आबाळे, पुणे विद्यापीठाच्याबोर्ड ऑफ स्टडीज कॉम्पुटर मॅनेजमेंटचे अध्यक्ष डॉ. अमोल गोजे उपस्थित होते. या प्रोग्राम मध्ये 55 पेक्षा जास्त प्राध्यापकांनी भाग घेतला.

_MPC_DIR_MPU_II

डॉ. पराग काळकर म्हणाले, ” प्रत्येकाने एक मूल्यवर्धित कोर्स तयार करणे हे बदलत्या शिक्षण पद्धतीमध्ये आवश्यक असल्याचे नमूद केले. तसेच अभ्यासक्रमात केलेले बदल हे सर्व पदवी महाविद्यालयांना माहित झाले तर सर्व इच्छुक विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल”

डॉ. महेश आबाळे यांनी अभ्यासक्रम गुणवत्ता वाढीसाठी प्राध्यापकानी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

संस्थेच्या एम सी ए विभागाच्या संचालिका डॉ. दीपाली सवाई यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. सर्व विषयानुसार गटचर्चा करून अभ्यासक्रमाच्या आराखडा तयार करण्यात आला. सूत्रसंचालन किरण शिंदे यांनी केले. आभार संजय मठपती यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1